Purandar Fort Travelling : पुरंदर किल्यामधील झरे आणि हिरवाई पाहण्यासाठी वेगळीच मजा आहे .
Purandar Fort Travelling
जेव्हा तुम्ही फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच पुरंदर किल्ला पाहण्यासाठी गेले पाहिजे . कारण जेव्हा तुम्ही पुरंदर किल्यावर जासाल तेव्हा तुम्हाला तेथील झरे आणि हिरवाई पाहण्यासाठी वेगळीच मजा येणार आहे . तुम्हाला जर पुरंदर या किल्याला भेट देयची असेल तर तुम्ही जेव्हा पावसाळा सुरु होतो किंवा दिवाळीच्या नंतर भेट दिली पाहिजे. कारण पावसाळ्या नंतर तुम्हाला ढगाळ वातावरणाचा आनंद घेता येईल . आणि जर दिवाळी नंतर भेट देत असाल तर तुम्हाला या किल्याचे सौंदर्य अधिकच खुलून आलेले दिसेल .
जर तुम्ही पुरंदर किल्याला भेट देयला गेला असाल तर तुम्ही तेथील पुरुंदर जवळ असलेला वज्रगड बगीतला पाहिजे . आणि पुरुंदर किल्याच्या पायथ्यापासून ५ किलोमीटर अंतरावर श्रीदत्ताचे नारायणपूर अढळेल . किंवा पुरुंदर किल्यापासून १२ ते १३ किलोमीटर अंतरावर बालाजी केतकावले देवस्थान आहे .
जर तुम्ही पुरुंदर या किल्याला भेट देणार असाल तर तुम्हाल या किल्याविषय थोडक्यात माहिती असली पाहिजे
मित्रानो पुरुंदर या किल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता . आणि पुरंदर हा किल्ला तेराव्या शतकात बांधलेला किल्ला आहे . पुरुंदर या किल्यावर निजामशहा याने शंभर वर्ष वर्चस्व केले होते . त्यांनतर मालोजीराजे भोसले यांना पुरुंदर हा किल्ला मिळाला . आणि नंतर काही कालखंडानंतर पुरंदर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांना मिळाला .
पुरुंदर या किल्यावरील महत्वाची सूचना
पुरुंदर या किल्याचा काही भाग हा संरक्षण खात्याने ताब्यात घेतलेला आहे . त्यामुळे पुरुंदर किल्ला पाहण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी दिली जाते . हे भेट देण्यासाठी आलेल्या लोकांनी लक्षात घेतले पाहिजे .
जेव्हा तुम्ही पुरंदर या किल्यावर जासाल तेव्हा तुम्हाला या किल्यावरुन नीरा या नदीवर बांधलेल्या वीर धरणाचे पाणी पाहता येईल . आणि या किल्यावरील शिवकालीन जुन्या असलेल्या वस्तूंची पडझड झालेली दिसेल . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरुंदर या किल्याचा भाग संरक्षण खात्याच्या ताब्यात असल्यामुळे काही वर्षात थोडाफार बदल केलेला दिसेल . पुरुंदर या किल्यावर अगदी दाट झाडे आहेत . पुरुंदर या किल्यावर सर्वात जास्त अंजीर पेरू सीताफळ या फळांच्या झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.
पुरुंदर किल्ला यापासून सर्वात जवळचे पुणे शहर असल्यामुळे पुणे या शहरामधील जास्त प्रमाणामध्ये लोकं भेट देण्यासाठी सुटीच्या दिवशी येतात . पुणे या शहरामधील शाळा आणि कॉलेज या शाळांचा सहली पुरुंदर या किल्याला भेट देण्यासाठी येतात . आणि पुणे या शहरामध्ये विमान तळ असल्यामुळे पुरुंदर या किल्याला भेट देण्यासाठी बरेच लांबून लोक येतात . आणि पुरुंदर या किल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक पुण्यामध्ये आहे .
पुणे या शहरामध्ये विमानेने किंवा रेल्वे स्थानकावर आलेल्या लोकांना पुरंदर या किल्याजवळ जाण्यासाठी खाजगी वाहने आणि खाजगी बस असते . पुरुंदर या किल्यासाठी सर्वात महत्वाचा दिवसा म्हणजे १४ मे कारण छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असते त्यामुळे पुरुंदर या किल्यावर मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात .
पुरुंदर या किल्याजवळ कसे जाता येईल
पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर सासवड हे ठिकाण असून या ठिकाणावरून खाजगी बस , एसटी जाता येते .मोठ्या प्रमाणात रिक्षाच्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत .