District Court Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयातील शिपाई (हमाल ) कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक ( श्रेणी -३ ) या पदांसाठी उद्यापासून परीक्षा चालू होणार आहेत .
District Court Bharti 2023
जिल्हा न्यायालयातील शिपाई ( हमाल ) कनिष्ठ लिपिक लघुलेखक ( श्रेणी -३ ) इत्यादी पदांसाठी भरती होणार आहे . जिल्हा न्यालायामधील लघुलेखक ( श्रेणी -३ ) या पदासाठी वेतनमान हे ३८६०० ते १२२८०० एवढे वेतनमान मिळणार आहे . लघुलेखक ( श्रेणी-३ ) या पदासाठी पात्र होण्यासाठी शैक्षणिक पात्रता हि कोणत्याही मान्यता प्राप्त शाखेतून पदवीधर उतीर्ण असले पाहिजे . तसेच लघुलेखक ( श्रेणी -३ ) या पदासाठी पात्र होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणक न्यान असले पाहिजे . इंग्रजी लघुलेखनासाठी १०० शब्द हे प्रती मिनिट किंवा त्याहून अधिक गती असले पाहिजे . आणि मराठी लघुलेखनासाठी ८० शब्द हे प्रती मिनिट किंवा त्याहून अधिक जास्त गती असणे आवश्यक आहे .
कनिष्ठ लिपिक या पदाची माहिती आणि उमेदवाराची पात्रता आणि वेतनमान
कनिष्ठ लिपिक या पदासाठी उमेदवार हा पात्र होण्यासाठी शैक्षणिक पात्रता हि , कोणत्याही मान्यता प्राप्त शाखेतून पदवीधर उतीर्ण असले पाहिजे . ज्या विध्यार्त्याने ज्या जिल्यात कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज केला आहे त्या विध्यार्थ्याला त्या जिल्ह्याचे भाषा बोलता आली पाहिजे . आणि त्या जिल्ह्यातील भाषा समजली पाहिजे .कनिष्ठ लिपिक या पदासाठी ज्या विध्यार्थ्याने अर्ज केला आहे त्या विध्यार्थ्याला संगणकाचे पुरेशे न्यान असले पाहिजे . आणि त्या विध्यार्त्याला इंग्रजी आणि मराठी संगणकावरती टंकलेखन जमले पाहिजे . ज्या विध्यार्थ्याने कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज केला आहे त्या विध्यार्त्याला इंग्रजी टंकलेखन हे ४० शब्द हे प्रती मिनिट किंवा त्याहून अधिक शब्द लिहिता आले पाहिजेत . आणि मराठी टंकलेखन ३० शब्द हे प्रती मिनिट असले पाहिजे किंवा त्याहून अधिक गती असली पाहिजे . आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी पात्र झालेल्या विध्यार्थ्याला वेतनमान हे १९९०० ते ६३२०० पर्यंत असणार आहे .
शिपाई ( हमाल ) या पदाची माहिती आणि उमेदवाराची पात्रता आणि वेतनमान
जे विध्यार्थी शिपाई ( हमाल ) या पदासाठी अर्ज करणार आहेत किंवा केला आहे त्या उमेदवारासाठी वेतनमान हे १५००० पासून ते ४७६०० एवढे वेतनमान असणार आहे . तरी या वेतनमनामध्ये वाढकरण्यात येणार आहे . या वेतनामध्ये भत्ते हे प्रत्येक वेळी वाढवून दिले जातात . आणि शिपाई ( हमाल ) या पदासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता हा उमेदवार ७ वी उतीर्ण असला पाहिजे . आणि त्या उमेदवाराचे मार्क्स हे ५०./. पेक्षा कमी नाही तरी ५०./. पेक्षा जास्त मार्क्स असले पाहिजे . तरच तो उमेदवार शिपाई ( हमाल ) या पदासाठी पात्र ठरू शकतो .आणि त्या विद्यार्थ्यांची शरीरयस्थि चांगली असली पाहिजे .आणि या भरतीमधील सर्व पदांसाठी शुल्क आकारण्यात आली आहे . तरी या भरतीमधील सर्व पदांसाठी शुल्क हि सर्वसाधारण प्रवर्गासाठी रू १००० ./. आकारण्यात आली आहे .आणि मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर इत्यादींसाठी रू ९०० शुल्क आकारण्यात आली आहे .
जिल्हा न्यायालयातील पदांसाठी कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो
जिल्हा न्यायालयातील होणाऱ्या सर्व पदांसाठी अभ्यास हा आणि परीक्षेमध्ये इतिहास नागरीशास्त्र विज्ञान भूगोल चालू घडामोडी व्याकरण साहित्य सामान्य न्यान क्रिडा विषयी माहिती इत्यादी अभ्यासाचा समावेश असतो .
परीक्षाचे कोणत्या स्वरुपाची होते
लघुलेखक( श्रेणी -३ ) या पदासाठी परीक्षा हि इंग्रजी लघुलेखन चाचणी हि २० मार्काची असते . आणि मराठी लघुलेखन चाचणी हि २० मार्काची असते .व इंग्रजी टंकलेखन चाचणी हि २० मार्काची असते .आणि मराठी टंकलेखन चाचणी हि २० मार्काची असते . आणि मुलाखत हि २० मार्काची असते . असे सर्व गुण मिळून १०० मार्काचा पेपर असतो . लघुलेखक ( श्रेणी -३ ) या पदासाठी स्वछता आणि चापल्यता चाचणी नसते .
कनिष्ठ लिपिक या पदासाठी परीक्षा हि , चाळणी परीक्षा हि ४० मार्काची असते . आणि इंग्रजी टंकलेखन चाचणी २० मार्काची असते . व मराठी टंकलेखन चाचणी हि २० मार्काची असते . आणि मुलाखत हि २० मार्काची असते . असे सर्व गुण मिळून १०० मार्काची परीक्षा असते . कनिष्ठ लिपिक या पदासाठी इंग्रजी लघुलेखन चाचणी लागू नाही . तसेच मराठी लघुलेखन चाचणी सुद्धा लागू नाही .आणि स्वच्छता व चापल्यता चाचणी सुद्धा लागू नाही .
शिपाई ( हमाल ) या पदासाठी परीक्षा हि , चाळणी परीक्षा हि ३० मार्काची असते . आणि स्वच्छता आणि चापल्याता चाचणी हि , १० मार्काची असते . आणि मुलाखत हि १० मार्काची असते .असे सर्व गुण मिळून ५० मार्काची परीक्षा असते .शिपाई ( हमाल ) या पदासाठी इंग्रजी लघुलेखन चाचणी लागू नाही . तसेच मराठी लघुलेखन चाचणी सुद्धा लघु नाही . आणि इंग्रजी टंकलेखन चाचणी सुद्धा लागू नाही . व मराठी टंकलेखन चाचणी सुद्धा लागू नाही .